कल्पना कालेकर यांना महापौर पुरस्कार

कल्पना कालेकर यांना महापौर पुरस्कार

कल्पना कालेकर यांना महापौर पुरस्कार

१४ सप्टेंबर रोजी अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे बृहन्मुंबई महानगर पालिका आयोजित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ २०२२- २०२३’ संपन्न झाला. या पुरस्कार समारंभात पार्ले टिळक प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना कालेकर यांना महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या हस्ते २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कल्पना कालेकर या शिक्षण क्षेत्रात गेली ३१ वर्षे कार्यरत आहेत तसेच त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

Back to top