‘परिणीता सन्मान’ २०२४ चा कला पुरस्कार मानसी इंगळे यांना घोषित

‘परिणीता सन्मान’ २०२४ चा कला पुरस्कार मानसी इंगळे यांना घोषित

‘परिणीता सन्मान’ २०२४ चा कला पुरस्कार मानसी इंगळे यांना घोषित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘परिणीता सोशल फाउंडेशन’ तर्फे दरवर्षी ‘परिणीता सन्मान’ हा पुरस्कार आयोजित केला जातो. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना हे पुरस्कार दिले जातात. २०२४ चा कला क्षेत्रासाठीचा ‘परिणीता सन्मान’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे सुरेल क्रिएशन या सुप्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालिका मानसी इंगळे यांना. मराठी चित्रपट सृष्टीतील आणि मनोरंजन क्षेत्रातील देशात आणि परदेशात २०० हून अधिक इव्हेंट यशस्वीपणे पार पाडण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व त्यामागे घेतली जाणारी मेहनत यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय विद्या भवन, वाशी येथे पार पडणार आहे.
परिणीता सोशल फाउंडेशन ही संस्था महिला उद्योजक, नोकरदार महिला आणि गृहिणी यांसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यासपीठ असून प्रत्येक स्त्रीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश आहे.

Back to top