पार्ल्यात नारी चा संगीत अविष्कार

पार्ल्यात नारी चा संगीत अविष्कार

पार्ल्यात नारी चा संगीत अविष्कार

जगभर नारी दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी रचनात्मक विषयातून व शैलीतून नारी चित्र उत्साहात अविष्कृत होत असतात.
यावर्षी सतत नवनवीन प्रयोग करणारे पार्ल्यातील ज्येष्ठ संगीतकर्मी अरविंद मुखेडकर हे येत्या १० मार्च रोजी ‘नारी’ हा सांगितिक कार्यक्रम सादर करत आहेत. लतादीदी, मन्नाडे, मुकेश, किशोर, महेंद्र कपूर यांच्या सगळ्या ओतप्रोत मखमली गीतांचं ऐवज म्हणजे ‘नारी’.
या कार्यक्रमात माहिती देणारं रसरशीत निवेदन हे सुद्धा ‘नारी’ या कार्यक्रमाचा विशेष गुण राखण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर सुभाषिनी सौ. मंगला खाडिलकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. या कार्यक्रमाला ‘आम्ही पार्लेकर’ मिडिया पार्टनर म्हणून असेल.
सदर कार्यक्रम रविवार दिनांक १० मार्च रोजी सांयकाळी ६:१५ वाजता नाडकर्णी बाल कल्याण केंद्र सभागृह, चित्रकार केतकर मार्ग, विलेपार्ले पूर्व येथे संपन्न होणार असून प्रवेश मूल्य ‘ऐच्छिक’ आहे.

Back to top