‘स्वर-साधक’ पुस्तकाचे प्रकाशन

‘स्वर-साधक’ पुस्तकाचे प्रकाशन

‘स्वर-साधक’ पुस्तकाचे प्रकाशन

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपली उत्तुंग कारकीर्द घडवणाऱ्या पंधरा दिग्गज कलावंतांच्या सांगितिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे स्वर-साधक’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात लेखिका सुलोचना देवलकर यांनी सर्व दिग्गजांशी मुलाखतींच्या निमित्ताने साधलेला मनमोकळा संवाद आहे. यातील अनेक कलाकार आता हयात नसल्यामुळे या मुलाखती अधिकच मौलिक झाल्या आहेत.
लेखिकेने मुलाखतींमधून या कलाकारांची संगीत साधना, आयुष्याची क्षणचित्रे, करावा लागलेला संघर्ष, आलेले अनुभव, मिळालेले मानसन्मान यांसह कलाकारांचे शक्य तितके दर्शन घडविले आहे. संगीत क्षेत्रात वाटचाल करु इच्छिणाऱ्या नव्या पिढीतील कलाकारांनी हे पुस्तक जरूर वाचावे, कलावंतांच्या वाटचालीतून प्रेरणा घ्यावी व आपल्या संगीत साधनेचे मार्ग शोधावेत या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे.
पुस्तकाला प्रस्तावना विख्यात गायिका आशा खाडिलकर यांची आहे तर अतिशय समर्पक असा शुभेच्छा संदेश सुप्रसिद्ध साहित्यिका माधवी कुंटे यांनी दिला आहे.

Back to top